महाराष्ट्र विधानसभेच्या सोमवारी (दि. 21) होणार्या निवडणुकीत सर्व मतदारांनी मतदान करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला मतदानाचा घटनादत्त अधिकार दिला आहे. मतदारांनी कर्तव्य भावनेने, नकाराधिकार अर्थात ‘नोटा’ हा पर्याय न वापरता सर्वोत्तम उमेदवाराला मतदान करावे. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे. त्यांचा विजय एकतर्फी असला तरी या विकासपुरुषाचा विजय संपूर्ण राज्याला साजेसा असा व्हायला हवा. हॅट्ट्रिक होईल पण विकासाला विरोध करणार्यांची, विकास नाकारणार्यांची टीवटीव बंद व्हायला हवी.
महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या 288 आहे. महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. निवडणूक आयोगामार्फत मतदार जागृतीसाठी खूप प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येकाने कर्तव्य भावनेने व आपल्याच भविष्यासाठी मतदान करायलाच हवे. नोटा हा पर्याय असताच कामा नये. नोटा पर्याय दाबण्यापेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारखा सर्वोत्तम पर्याय निवडायला हवा. पनवेल मतदारसंघातून आमदार प्रशांत ठाकूर तिसर्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. सिडको अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्तम काम केले. दोन टर्म आमदार म्हणून लक्षणीय अशी त्यांची कारकीर्द आहे. पनवेल मतदारसंघात त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवारच उभा नाही. आमदार प्रशांत ठाकूर सहजपणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. केवळ ते किती मताधिक्य घेतात याचीच उत्सुकता बाकी आहे. येथील लढत एकतर्फी असली तरी या मतदारसंघाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील सर्वाधिक मतदार असणारा हा सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी मतदारसंघाला वेगळी ओळख निर्माण करून दिली. या मतदारसंघात सर्वाधिक मतदार आहेत, त्याचप्रमाणे या मतदारसंघातून मतदानाचा टक्काही मोठा असेल हे दाखवून द्यायला हवे. पनवेलचा विकास आणि भविष्यासाठी मोठ्या संख्येने मतदान व्हायला हवे. आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय निश्चित असला तरी तो मोठा असायला हवा. डोळ्यांत भरणारा हवा. विजय जितका मोठा तितके आमदार प्रशांत ठाकूर यांचे भवितव्य चांगले असेल. त्यांचे भविष्य चांगले असेल, तर पनवेलचे भविष्यही निश्चितच उज्ज्वल असेल यात शंकाच नाही. उत्तुंग असे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे. पनवेल शहरातील फ्लायओव्हर, उपजिल्हा रुग्णालय अशी कितीतरी कामे ठळकपणे दाखविता येतील. सिडकोचे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. राज्यमंत्रिपदाचा दर्जा असणारे हे पद आहे. आमदारांच्या डोक्यात मात्र याची कधीच हवा गेली नाही. अगदी जमिनीवर पाय ठेवून काम करणारे हे नेतृत्व आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक कार्य, लोकसेवेची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. त्यांचा हाच वारसा आणि वसा घेऊन आमदार प्रशांत ठाकूर पुढे जात आहेत. विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी ते सज्ज आहेत, पण ही हॅट्ट्रिक मोठ्या मतांनी व्हायला हवी. त्यासाठी पनवेलच्या जनतेने मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे व आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना मतदान करायलाच हवे.