रोहे ः प्रतिनिधी
रोहा तालुका श्रीवर्धन, पेण अलिबाग विधानसभा मतदारसंघात विभागला असल्याने या तीन्ही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी सोमवारी रोहा तालुक्यात शांततेत मतदान झाले. सोमवारी सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनोद घोसाळकर यांनी शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, माजी तालुकाप्रमुख नितीन तेंडुलकर यांच्यासमवेत येथील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. रोहा तालुक्यातील चणेरा व यशवंतखार हा विभाग अलिबाग विधानसभा मतदारसंघात येतो. रोहा शहर, धाटाव व घोसाळे विभाग हा परिसर श्रीवर्धन विधानसभा मरतदारसंघात, तर कोलाड, नागोठणे, सुतारवाडी, देवकान्हे व पिंगळसई विभाग पेण विधानसभा मतदारसंघात मोडतो.