Breaking News

लोकशाहीचा उत्सव

गेले अनेक महिने वाजत-गाजत असलेल्या विधानसभा निवडणुकीचे सूप अखेर सोमवारी संध्याकाळी सहा वाजता वाजले. आता प्रतीक्षा आहे ती निव्वळ अपेक्षित असलेल्या निकालाची. महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन भाजपप्रणित सरकारे असलेल्या राज्यांमध्ये सोमवारी मतदान पार पडले. दोन्ही ठिकाणी मतदारांनी अपेक्षेनुसार प्रतिसाद देत आपला कौल मतदानयंत्रात बंदिस्त केला आहे. मतदानयंत्रात बंदिस्त असलेल्या या निकालाची उत्सुकता जरुर असली तरी निकाल सर्वसाधारणपणे काय लागणार याची बहुतेकांना खात्री आहे. भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीचे सरकार निर्णायक कौल घेऊन पुन्हा एकवार सत्तेवर येणार याची विरोधकांना देखील पुरेशी कल्पना आहे. कारण या निवडणुकीत मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात कुणीही तगडा विरोधक उभा नव्हता. निवडणुकीत चुरस नसल्यामुळेच मु‘यमंत्र्यांनी या निवडणुकीत मजा नाही असे मत प्रचारादरम्यान व्यक्त केले होते. सोमवारी संध्याकाळी मतदानाची वेळ संपता-संपता सुमारे 55 ते 58 टक्के मतदान झाल्याचे चित्र दिसत होते. अर्थात त्याही वेळेला अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. मतदानाची टक्केवारी पाहता कौल सत्ताधार्‍यांच्या बाजूनेच असल्याचे दिसते. पाच वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदाची मतदानाची आकडेवारी आताच्या घडीला थोडी कमी भासते आहे. परंतु ही बाब सत्ताधारी भाजप-सेनेच्या पथ्यावरच पडणारी आहे. सत्तापालटाच्या इराद्याने मतदार मतदानासाठी उतरतो तेव्हा टक्केवारी आपोआप वाढते. ती किंचित घसरते तेव्हा सत्ताबदलाचा कोणताही संकेत नसल्याचा निष्कर्ष निवडणूक अंदाज तज्ज्ञ काढतात. नेमके हेच चित्र सोमवारी सायंकाळी विविध वाहिन्यांनी जाहीर केलेल्या मतदानोत्तर पाहणीमध्ये (एक्झिट पोल) दिसते आहे. बहुतेक पाहणी संस्थांनी भाजप-शिवसेना सरकारच्या बाजूने दोन तृतियांश बहुमताची ग्वाही देऊन टाकली आहे. या निवडणुकीत पाच ठळक मुद्दे प्रकर्षाने दिसले. एका अर्थी यंदाची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण म्हणावी लागेल. काही महिन्यांपूर्वी विरोधी पक्षांनी कंबर कसून मु‘यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची तयारी सुरू केली होती. काँग‘ेस आणि राष्ट्रवादी काँग‘ेसची संघर्ष यात्रा हा त्या मोहिमेचा आरंभबिंदू म्हणावा लागेल. पाण्याचे दुर्भिक्ष्य, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, मराठा आणि धनगर आरक्षण, सरकारी नोकरभरती अशा अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा विरोधकांचा डाव पूर्णत: उलटला. विरोधी पक्षांच्या प्रत्येक आरोप आणि आक्षेपाला मु‘यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले आणि विविध योजना जाहीर करून विरोधकांची तोंडे बंद केली. परिणामत: विरोधी पक्षांकडे कोणताच मुद्दा न उरल्याने ते निरुत्तर झाले. विरोधी पक्षांचेच तालेवार नेते भाजप-सेनेकडे ओढले गेले यामागे हे प्रमुख कारण आहे. पक्षांतराच्या लाटेनंतर निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सर्वच पक्षांना बंडखोरीला सामोरे जावे लागले. काही प्रमाणात भाजप आणि शिवसेनेलाही याची झळ लागली. तरीही त्याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता नाही. या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विरोधकांनी घसरवलेला प्रचाराचा स्तर. अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने भाषणे, प्रतिकि‘या आणि टीकाटिप्पणी करून विरोधकांनी आपलीच हताशा दाखवली. या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर अपप्रचारासाठी करण्यात आला. अखेरचे वैशिष्ट्य म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदललेला दिसून आला. आगामी विधानसभेत नव्या उमेदीचे तरुण चेहरे महाराष्ट्राच्या जनतेला दिसतील.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply