Breaking News

महाडमध्ये वीज पडून 17 जण जखमी

महाड : प्रतिनिधी

महाड तालुक्यातील मुमुर्शी आदिवासीवाडीतील झोपड्यांवर वीज पडून 17 आदिवासी लोक जखमी झाले आहेत. यात एका वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. ही घटना मंगळवारी (दि. 22) रात्री आठच्या सुमारास घडली. जखमी आदिवासींवर विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

याबाबत येथील तलाठी पाटील यांनी संबंधित घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. नुकसानग्रस्त आदिवासींना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. (सविस्तर वृत्त पान 7 वर..)

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply