Breaking News

रायगडात मतदानाचा टक्का घसरला

मतदारराजा कोणाला देणार धक्का? आज फैसला

पाली : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत सोमवारी मतदान घेण्यात आले. प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. तरीही सात विधानसभा मतदारसंघांत सरासरी 65.86 टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का घसरल्याने मतदारराजा कुणाला धक्का देणार हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.  जिल्हा प्रशासनाकडून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. निवडणुकीआधी मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती करण्यात आली होती. प्रसिद्धिमाध्यम, जाहिरात, पथनाट्य, बॅनरबाजी या मार्गाने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. शाळा, महाविद्यालय, आरोग्य केंद्र, महसूल प्रशासन यांच्यामार्फतदेखील मतदार जागृती करण्यात आली. राजकीय पक्षांनीही मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले होते. यंदा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत एकूण 22 लाख 66 हजार 679 मतदार होते. त्यापैकी 7 लाख 82 हजार 580 पुरुष मतदार, 7 लाख 13 हजार 782 महिला मतदार आणि एक तृतीयपंथी असे एकूण 14 लाख 96 हजार 363 मतदारांनी सोमवारी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघात 54.13 टक्के मतदान झाले. उरण 74.32, कर्जत 70.81, पेण 71.28, अलिबाग 72.61, श्रीवर्धन 60.84 आणि महाडमध्ये 66.98 टक्के असे मतदान झाले. एकूण मतदान 65.86 टक्के झाले आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत 70.25 टक्के मतदान झाले होते. 2019च्या निवडणुकीत 4.39 टक्क्यांनी मतांचा टक्का घसरला आहे.  गुरुवारी दिग्गज उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे. मतदानाचा घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडला हे त्या वेळी स्पष्ट होणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply