Breaking News

उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घनःश्याम कडू

उरण : रामप्रहर वृत्त

उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घनःश्याम दामोदर कडू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. घनःश्याम कडू यांची अध्यक्षपदी निवड होताच त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा काल 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी अध्यक्ष संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीस निधन झालेले राजकीय नेते, पूरग्रस्त यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व सा. प्रांजलचे संपादक घनःश्याम कडू यांची एकमुखी निवड करण्यात आली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे- अध्यक्ष घनःश्याम कडू, उपाध्यक्ष जे. एस. घरत, कार्याध्यक्ष धनंजय गोंधळी, सेक्रेटरी रा. ऊ. म्हात्रे, सहसेक्रेटरी सुयोग गायकवाड, खजिनदार हसमुख भिंडे, सल्लागार संजय गायकवाड, सदस्य दा. चां. कडू, महेश गायकवाड, राजेंद्र नाईक, वैशाली कडू यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. या वेळी मोहन माळी, गायकवाड  यांच्यासह नवीन कार्यकारिणी उपस्थित होती. पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार घनःश्याम कडू यांची निवड होताच त्यांचे अनेकांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply