Breaking News

पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांची विजयी हॅट्ट्रिक

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. तब्बल 92 हजार 370 मतांची आघाडी घेत त्यांनी कोकणातील सर्वांत मोठा विजय साकारला. त्यांना एक लाख 78 हजार 581 मते मिळाली. त्यांनी शेकापच्या उमेदवाराला तिसर्‍यांदा चारीमुंड्या चीत केले. त्यामुळे पनवेलमध्ये ऐतिहासिक विजयाची दिवाळी साजरी झाली. या वेळी संपूर्ण पनवेलनगरी ’एकच वादा प्रशांतदादा’ या गर्जनेने दणाणून गेल्याचे

पाहावयास मिळाले. 

विजयानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन केले. मतदार, नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार मानले. या वेळी सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. जागोजागी औक्षण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय झाला. त्यामुळे आपणच जिंकलो असे उत्साही वातावरण सर्वांमध्ये दिसून आले. लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या विकासकामांमुळे पनवेलच्या विकासाचा आलेख कायम उंचावत राहिला. म्हणूनच त्यांना मतदारांनी भरभरून कौल दिला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावरही अभिनंदनाचा वर्षाव झाला.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply