Breaking News

सर्वांच्या सहकार्यामुळेच अभूतपूर्व यश -मोहन काळे

कर्जत : प्रतिनिधी

कोकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालयाला महाराष्ट्रातील बेस्ट कॉलेज तसेच प्राचार्य डॉ. मोहन काळे यांना बेस्ट प्रिन्सिपल अ‍ॅवॉर्ड मिळाल्याने महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. या अ‍ॅवॉर्डचे श्रेय तुम्हा सर्वांचे आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच अभूतपूर्व यश मिळाले. यापुढेही असेच सहकार्य लाभल्यास आपल्या महाविद्यालयाचे नाव अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केला.

फार्मसी डिप्लोमाच्या प्रमुख डॉ. वैशाली जाधव यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. प्रा. प्रीतम जुवाटकर यांनी डॉ. काळे यांनी हे यश कसे मिळविले ते सविस्तरपणे सांगितले. संस्थेचे खजिनदार झुलकरनैन डाभिया यांच्या हस्ते डॉ. काळे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्वांनी एकत्रित येऊन काम केल्यास आपले महाविद्यालय आणखी यश संपादन करू शकेल. आपण आपले काम प्रामाणिकपणे केले तर महाविद्यालय आणखी पुढे जाईल, असे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य विजय मांडे यांनी सांगितले.

 सूत्रसंचालन प्रा. अमोल बोराडे यांनी केले. संस्थेचे सचिव प्रदीप शृंगारपुरे, माजी नगराध्यक्ष शरद लाड, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य सतीश पिंपरे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. रेवती देशपांडे यांनी आभार मानले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply