Breaking News

पालीत एकदिवसीय कार्यकर्ता शिबिर

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील प्रथम धम्मगुरू भदन्त संघकिर्ती (झाप-पाली) यांच्या 20व्या स्मृतीदिनानिमित्ताने तालुका बौद्धजन पंचायत आणि दि पीपल्स वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने पालीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात रविवारी (दि. 3) सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत

एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सुधागड तालुका बौध्दजन पंचायतचे अध्यक्ष दीपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या शिबिरात समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजूभाऊ कदम, दि पीपल्स वेल्फेअर चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन राजाराम मोरे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या अधिक माहितीसाठी नरेश शिंदे (9226857590), राजेश गायकवाड (8446290023) किंवा राजू वाघमारे (8097004802) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply