Breaking News

येस बँकेवरील निर्बंध दूर; ग्राहकांना दिलासा

मुंबई : खासगी क्षेत्रातील येस बँकेची सेवा बुधवारी (दि. 18) दोन आठवड्यानंतर पूर्ववत सुरू झाली. रिझर्व्ह बँकेने बुधवारी संध्याकाळी सहा वाजता निर्बंध दूर केले. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना नेहमीप्रमाणे व्यवहार करता येणार आहेत. बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात कर्जवाटपात अनियमितता आढळून आल्याने रिझर्व्ह बँकेने 5 मार्च रोजी निर्बंध घातले होते. 3 एप्रिलपर्यंत खातेदारांना 50 हजार रुपयेच काढण्याची परवानगी देण्यात आली होती. येस बँकेवरील निर्बंध बुधवारी दूर झाले असून ग्राहकांना पूर्वीप्रमाणे सर्व सेवा उपलब्ध झाल्या आहेत. खातेदारांकडून पैसे काढण्याची शक्यता लक्षात घेत बँकेने 30 हजार कोटींची तरतूद केली आहे, ज्यात 22 हजार कोटींच्या सरकारी बँकांमधील ठेवी आणि नऊ कोटींचे आंतरबँक कर्जे आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply