Breaking News

किल्ले सजावट स्पर्धेत शिवदुर्ग प्रतिकृती प्रथम

पेण : प्रतिनिधी 

येथील शिवप्रतिष्ठान मंडळाने आयोजित केलेल्या किल्ले सजावट स्पर्धेत चिंचपाडा येथील शिवसूर्य मंडळाच्या शिवदुर्ग प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर राहुल रमेश पाटील (तरे आळी, पेण) व विराज हुंबरे (धावटे) यांनी उभारलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. 

पेण येथील शिवप्रतिष्ठानतर्फे दरवर्षी किल्ले सजावट स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत पेणमधील अनेक मंडळे व तरुणांनी सहभाग घेतला होता. लहान गटात तरे आळीतील गणेश मित्र मंडळाने द्वितीय व शिवसूर्य मित्र मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोमवारी महात्मा गांधी मंदिर येथे पार पडले. वाचनालयाचे उपाध्यक्ष अशोक देसाई व पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.  या वेळी निसर्ग फ्रेंडशिप संस्थेचे कोकण विभाग अध्यक्ष योगेश म्हात्रे आणि खेळाडू सोनाली मालुसरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पेण शहर मराठा समाजाचे अध्यक्ष प्रवीण बैकर उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply