Breaking News

एसटी कर्मचार्‍याला मारहाणप्रकरणी प्रवाशावर पोलिसांत गुन्हा दाखल

पेण : प्रतिनिधी  

 चालू एसटी बसमध्ये चढण्यास मज्जाव केल्याच्या रागातून एका प्रवाशाने बुधवारी दुपारी एसटी कर्मचार्‍यास मारहाण केली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पनवेल ते रोहा ही एसटी बस (एमएच-14, बीटी-1413) बुधवारी दुपारी 1.50च्या सुमारास पेण एसटी स्टँडमध्ये आली. ती चालू असताना प्रवासी बसमध्ये चढू लागले. त्यास एसटी कर्मचार्‍याने मज्जाव केला. त्याचा राग येऊन प्रवाशाने एसटी कर्मचार्‍यास मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक निरीक्षक आर. पी. पवार करीत आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नावेखाडीत शिवमंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नावेखाडी मधलापाडा येथे शिवमंदिर जीर्णोद्धार आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना सोहळा माजी …

Leave a Reply