Breaking News

रोजा असूनही खेळणार्या त्या दोघांना धवनचा सलाम

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था

आयपीएलचा 12वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. पहिल्या एलिमिनेटरमध्ये दिल्लीने हैदराबादचा शेवटच्या बॉलवर पराभव केला. हैदराबादकडून राशिद खानने दोन विकेट घेतल्या, तर ऑलराऊंडर मोहम्मद नबीने 13 बॉलमध्ये 20 धावांची खेळी केली. या दोघांच्या चांगल्या कामगिरीनंतरही हैदराबादला ही मॅच जिंकता आली नाही. असं असलं तरी दिल्लीचा ओपनर शिखर धवनने राशिद खान आणि मोहम्मद नबीला सलाम केला आहे. रमजानच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. यामुळे अफगाणिस्तानच्या या दोन्ही क्रिकेटपटूंनी मॅच असूनही रोजा ठेवला होता. दिवसभर काहीही न खाता हे दोघं संध्याकाळी 7.30 वाजता मैदानात उतरले. रोजा असतानाही त्यांच्या कामगिरीमध्ये कोणताही फरक पडला नाही. शिखर धवनने मॅचनंतर या दोघांसोबतचा एक फोटो ट्विट केला. ‘सगळ्यांना रमजानच्या शुभेच्छा. या दोघांबद्दल मला अभिमान आहे. दिवसभर काहीही न खाता-पिता मॅच खेळणं सोपं नाही, पण या दोघांनी ते अगदी सहज करून दाखवलं, दोघंही त्यांच्या देशासाठी आणि विश्व क्रिकेटसाठी प्रेरणा देणारे आहेत. तुमची ऊर्जा सगळ्यांना मोठी स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देते. अल्लाहचा आशीर्वाद तुमच्यावर असाच राहो,’ असं ट्विट शिखर धवनने केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply