नवीन पनवेल ः येथील राजे शिवराय प्रतिष्ठानतर्फे दिवाळीनिमित्त ‘किल्ले श्री राजगड’ची प्रतिकृती साकारण्यात आली होती. या ठिकाणी मंडळातर्फे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सिडको आरक्षित पोलीस मैदानावर सेक्टर सात येथे आयोजित या कार्यक्रमाला महिलांनी मोठी उपस्थिती दर्शविली. तसेच श्री राजगडची प्रतिकृती पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.