Breaking News

पनवेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे ‘रन फॉर युनिटी’

पनवेल : रामप्रहर वृत्त

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 31) ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे रन फॉर युनिटी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत एकूण 30 सभासदांनी सहभाग नोंदविला. दोन किमीच्या या रॅलीची रामचंद्र मिशन सेक्टर 15 येथे सांगता झाली. या वेळी संघाचे अध्यक्ष श्री. गैरोला यांनी सरदार पटेल यांची यशोगाथा उपस्थितांसमोर उलगडली. या रॅलीचे यशस्वी आयोजन ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री. कुलकर्णी, सभासद श्री. गौडार यांनी केले होते.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply