Breaking News

पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी माथेरान नगराध्यक्षांचा पुढाकार

कर्जत : बातमीदार

माथेरानमध्ये दिवाळी पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पर्यटकांची फसवणूक होते. त्याला आळा घालण्यासाठी नगरध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दस्तुरी येथे जाऊन तेथील घोडेवाले, रिक्षावाले यांच्याशी संवाद साधला व पर्यटकांना चांगली सुविधा देण्यासाठी तसेच फसवणूक करू नये याबाबत सूचना दिल्या. दस्तुरी येथे पर्यटक उतरल्यावर काही घोडेवाले आणि रिक्षावाले अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन पर्यटकांची फसवणूक करतात, तर काही घोडेवाले पर्यटकांच्या मोटारगाडीला गराडा घालून दिशाभूलसुद्धा करतात. सध्या येथील मिनीट्रेन बंद असल्याचा फायदा उचलत पर्यटकांना फसविले जात आहे. हे प्रकार म्हणजे माथेरानच्या पर्यटनासाठी धोक्याची घंटा आहे, असे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांचे म्हणणे आहे. माथेरानमधील पर्यटन बहरावे यासाठी नगराध्यक्षांनी दस्तुरी येथील सर्व वाहनतळाची पाहणी करून टॅक्सीवाल्यांशी संवाद साधला. या वेळी नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रसाद सावंत, माजी नगरसेवक कुलदीप जाधव आदी उपस्थित होते.

माथेरानचे घोडेवाले व रिक्षावाल्यांनी पर्यटकांची फसवणूक न करता इमानेइतबारे आपले काम केले, तर नक्कीच माथेरानला सुगीचे दिवस येऊ शकतात.

-प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply