Breaking News

सुकापूरमध्ये शेकापला पुन्हा धक्का!, कार्यकर्त्यांचा भाजपत जाहीर प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल परिसरात मोठ्या उत्साहात विविध ठिकाणी छट्पूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत सुकापूर येथे भाजप उत्तर भारतीय समितीतर्फे छट्पूजेनिमित्त  शनिवारी (दि. 2) भजनसंध्या आयोजित करण्यात आली होती. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकापच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. सुकापूर येथे शनिवारी छट्पूजेनिमित्त आयोजित या कार्यक्रमावेळी शेकापच्या ममता जसवाल, प्रीती चव्हाण, शिवाजी चव्हाण, शुभांगी चव्हाण यांनी भाजपत जाहीर प्रवेश केला. या वेळी पाली देवद पंचायत समिती संयोजकपदी हितेश शर्मा आणि उत्तर भारतीय सेलच्या सहसंयोजकपदावर मंदलाल दुरी शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, आत्माराम केणी, भाजप नेते पांडुरंग केणी, अशोक पाटील, योगेश पाटील, रूपेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. परिसराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाहीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply