Breaking News

मोहोपाड्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव

आढळले चार पॉजिटिव्ह रुग्ण; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

मोहोपाडा : प्रतिनिधी

कोरोनाने दोन महिन्यानंतर पुन्हा रसायनी (मोहोपाडा) शिरकाव करून परीसरात भीती निर्माण केली आहे. यातच  चांभार्ली रिस हद्दीत एक तर मोहोपाडा येथे तीन रुग्ण नव्याने आढळले आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर याअगोदरही वासांबे (मोहोपाडा) हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात सर्वाधिक होती.

सध्या खालापूर तालूक्यात 54 पॉजिटिव्ह कोरोना रुग्ण असून एकूण 3071 मधील 2895 रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण 125 मयत असून खालापूर तालुक्यात 54 रुग्ण पॉजिटिव्ह आहेत. यातील चौक मंडलात एकूण 1005 रुग्णसंख्या झाली आहे.

दरम्यान, वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीतील रिस येथे एक तर मोहोपाडा येथे तीन कोरोना रुग्ण आढळल्याने परीसरात पुन्हा घबराट पसरली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून मास्क वापरून आपली व आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागात वाढतोय संसर्ग

सध्या संपुर्ण देशात, राज्यात व ग्रामीण भागात कोरोना महामारीचे महाभयंकर संकट गेल्या वर्षीपासून समोर उभे आहे. त्यातच सागरी वादळामुळे न भुतो न भविष्यती अशा स्वरुपाची प्रचंड आर्थिक व नैसर्गिक हानी होऊन जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. कोरोना महामारीचे संकट मानगुटीवरच येऊन बसले आहे. कधी, कुठे, कसे, कुणाला, कशाप्रकारे गाठुन वेठीस धरेल हे कुठलाही ज्योतीषी वा तज्ञही सांगु न शकणारी सत्य आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पनवेल परिरातील ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने नागरिकांनी जास्तीत जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply