Breaking News

नवीन पनवेल परिसरात छट्पर्व उत्साहात, आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले छट्पूजेचे दर्शन

पनवेल ः  रामप्रहर वृत्त

दिवाळीनंतर कार्तिक महिन्यात उत्तर भारतात छट्पर्व मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते. त्यानिमित्त नवीन पनवेल, खांदा कॉलनी, खारघर, कामोठे, कळंबोली येथे छट्पूजा उत्साहात करण्यात आली. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध ठिकाणी जाऊन छट्पूजेचे मनोभावे

दर्शन घेतले. या वेळी पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक एकनाथ गायकवाड, संतोष शेट्टी, डॉ. अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, नीलेश बावीस्कर, अमर पाटील, राजू शर्मा, नगरसेविका कुसुम म्हात्रे, राजश्री वावेकर, विद्याताई गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, विनोद घरत, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी, उत्तर भारतीय सेलच्या शहर अध्यक्षा निशा सिंग, गीता चौधरी आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply