पनवेल : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची जयंती त्यांच्या जन्मभूमीत शिरढोण येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने या दोन्ही आमदारांचे विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले.