Breaking News

देशात सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी नियमावली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारकडून सोशल मीडिया आणि ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी (दि. 25) पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. या संदर्भात नवा कायदा येणार असून, पुढील तीन महिन्यांत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
हल्ली सोशल मीडियाचा वापर फेक न्यूज, अफवा, हिंसा अशा गोष्टी पसरवण्यासाठी केला जात आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मसंदर्भातही अनेक तक्रारी येत आहेत. अनेक प्रकरणे न्यायालयातही गेली आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नियमावली जारी केली आहे. नव्या गाइडलाइन्स हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसहीत नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, हॉटस्टार अशा ओटीटी प्लॅटफॉर्म्सनाही लागू असतील.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीचा आत्मा आहे, मात्र ते स्वातंत्र्य जबाबदारीसह असावे, यासाठी ही नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
-रवीशंकर प्रसाद, केंद्रीय दूरसंचारमंत्री

सर्व मीडिया प्लॅटफॉर्मला समान नियम असायला हवे. लोकांनीदेखील या संदर्भात मोठ्या प्रमाणावर मागणी केली होती. त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे.
-प्रकाश जावडेकर, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply