पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा नवीन पनवेल सेक्टर 18 येथील सिडको समाजमंदिरात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
स्पर्धेचे बक्षीस वितरण रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या उपाध्यक्ष स्नेहल कडू यांच्या हस्ते झाले. स्पर्धेसाठी मुख्य पंच पराग अंकोलेकर व राजेश कुरबेट यांनी काम पाहिले.
गटनिहाय निकाल (विजेते व उपविजेते)
नवोदित : मुली-तनिक्षा मोकल डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, वेदिका भगत सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, मुले-विरेन मनियाल डॉन बॉस्को पब्लिक स्कूल, हिमांकसिंग कारकी पवार पब्लिक स्कूल पलावा; 10 वर्षाखालील : मुली-इशा जाधव डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, स्वस्ती भोईर सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, मुले-शिवेश तांबोळी डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, अखिल गुब्बाला रायन इंटरनॅशनल स्कूल खांदा कॉलनी; 12 वर्षाखालील : मुली-आदिती जाधव डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, अनिशा पात्रा डीएव्ही इंटरनॅशनल स्कूल खारघर, मुले-सिद्धार्थ गुब्बाला डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल नेरूळ, स्वस्तिक कुंडू डीएव्ही स्कूल नवीन पनवेल; 14 वर्षाखालील : मुली-आदिती जाधव, सान्वी जैन रायन इंटरनॅशनल स्कूल खारघर, मुले-सिद्धार्थ गुब्बाला, अरौद्र ठाकूर डॉ. पिल्लेज ग्लोबल अकॅडमी पनवेल; 17 वर्षाखालील : मुली-अनिशा पात्रा, सान्वी जैन, मुले-तेजस कुमार बालभारती स्कूल खारघर, अरौद्र ठाकूर; युवा : मुली-अन्वी इंगळे व्हीजेटीआय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, संस्कृती शर्मा डीएव्ही स्कूल नवीन पनवेल, मुले-आदित्य मित्रा अमायटी युनिव्हर्सिटी पनवेल, सिद्धार्थ गुब्बाला; 12 वर्षाखालील दुहेरी : मुली- तनिक्षा मोकल व वेदिका भगत सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल, इशा जाधव व स्वस्ती भोईर सेंट जोसेफ हायस्कूल नवीन पनवेल; मुले-सिद्धार्थ गुब्बाला व क्र्रिष्णतन्मय गंगाराजू नेरूळ, ओजस लोथे व पार्थ ढाबे दोघेही डीएव्ही स्कूल नवीन पनवेल; 14 वर्षाखालील दुहेरी : मुली-आदिती जाधव व अनिशा पात्रा, अवनी कुरबेट डीएव्ही स्कूल नवीन पनवेल व मनाली चिलेकर सीकेटी स्कूल नवीन पनवेल; मुले-सिद्धार्थ गुब्बाला व क्र्रिष्णतन्मय गंगाराजू, अरौद्र ठाकूर व प्रणव गर्ग नेरूळ; पुरुष दुहेरी-दिजांग कामसन उलवे व सिद्धार्थ गुब्बाला; शिवराज पाटील नवी मुंबई व विजयसिंह रावत तळोजा; महिला एकेरी-आदिती जाधव, अन्वी; पुरुष एकेरी-दिजांग कामसन, विजयसिंह रावत; ज्येष्ठ-समीर शिंदे, अमित दशमाना; ज्येष्ठ दुहेरी-समीर शिंदे व राजेंद्र बार्शिले, सूर्यकांत पाटील व एस. एम. तळनीकर; डॉक्टर गट-प्रमोद घारगे, अभय शेेटे नवीन पनवेल.