Breaking News

शेफाली वर्माने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

ग्रोस आयलेट : वृत्तसंस्था

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारी 15 वर्षीय शेफाली वर्मा ही भारताची सर्वांत युवा खेळाडू ठरली आहे. या तडाखेबंद खेळीसह तिने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा 30 वर्षे जुना विक्रमही मोडला. शेफालीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात 49 चेंडूंमध्ये 73 धावांची तुफानी खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विंडीजवर 84 धावांनी धमाकेदार

विजय मिळवला.

शेफालीचा हा पाचवा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना होता. तिने या सामन्यात सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने अवघ्या 49 चेंडूंत 73 धावांची तुफानी खेळी केली. शेफालीने ही कामगिरी 15 वर्षे आणि 285 दिवस वयाची असताना केली. तिने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा 30 वर्षे जुना विक्रम मोडला. सचिनने 16 वर्षे आणि 214 दिवस वयाचा असताना

पहिले कसोटी शतक झळकाविले होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply