नवी दिल्ली : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून शनिवारी निकाल देण्यात आला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असून, ती हिंदूंना देण्याचा निर्णय कोर्टाने दिला. न्यायालयाच्या निकालानंतर आता राम मंदिर उभारले जाणार आहे. राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रामजन्मभूमीची वादग्रस्त जमीन ही हिंदूंनाच देण्यात येणार असल्याचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आला आहे, तर मुस्लिम समुदायाला स्वतंत्र जमीन देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रामलल्लाच्या बाजूने देण्यात आलेल्या या निर्णयामध्ये मुस्लिम समुदायासाठीसुद्धा एका महत्त्वाच्या ठिकाणी पाच एकर जमीन देण्यात यावेत, असे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …