Breaking News

लॉकडाऊन शिथिलतेबाबत चित्र स्पष्ट

जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक निर्देश जारी

अलिबाग : प्रतिनिधी – कोरोना या आपत्कालीन विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीची सूचना, साथरोग अधिनियम 1897च्या कलम 2 अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा उपयोग करुन आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005च्या इतर सर्व तरतुदीनुसार लॉकडाऊन कालावधीतील मनाई आदेश 17 मेच्या रात्री 12पर्यंत लागू करण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पनवेल तालुका वळता रायगड जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये येत असल्याने जिल्ह्यासाठी मार्गदर्शक निर्देश लागू राहणार आहेत.

वाहतूक : ज्या वाहनांना व व्यक्तींना जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीची परवानगी मिळालेली आहे, त्यांना वाहतूकीस परवानगी राहील, चार चाकी वाहनांमध्ये वाहनचालक व इतर दोन प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी राहील. दुचाकीवरून एकाच व्यक्तीला प्रवास करता येईल. सहप्रवाशाला प्रवास करता येणार नाही.

शहरी भागातील औद्योगिक संस्था :  मुंबई महानगर प्रदेशातील (चचठ ठशसळेप) महानगरपालिका क्षेत्र (पनवेल महानगरपालिकेचे क्षेत्र) वगळून विशेष आर्थिक क्षेत्र (डएनी), निर्यातक्षम केंद्र (एुिेीीं ेीळशपींशव णपळीीं-एजणी), औद्योगिक वसाहत व औद्योगिक शहरे काही निर्बंधासह सुरू राहतील.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक वस्तूंची उत्पादने, औषधे (र्ऊीीसी रपव झहरीारलर्शीींळलरश्री), वैद्यकीय उपकरणे, त्यांना लागणारा कच्चा माल व पूरवठा साखळीतील उद्योग व अखंडीत प्रक्रीया सुरू ठेवणे आवश्यक असणारे कंपन्या व त्यांची पुरवठा साखळी, जीवनावश्यक वस्तूसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शिफ्टमध्ये काम करणार्‍या कंपन्या, पॅकेजिंग क्षेत्रातील कंपन्या जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने सुरू राहतील. त्यांच्या कामगारांनी मास्क वापरणे, हॅण्ड सॅनिटायझचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे इ. सुरक्षेच्या उपाययोजनांच्या पालन करणे, या अटीस बंधनकारक राहून त्यांना त्यांचे उद्योग सुरु ठेवण्यास परवानगी राहील. ग्रामीण भागातील सर्व उद्योग सुरू राहतील. माल वाहतुकीच्या वाहनांना (वाहने रिकामे असतील तरीही) आंतरराज्यात वाहतूक करण्यास परवानगी राहील.

जिल्हाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर नागकिरांच्या स्थलांतराबाबत राज्य शासनाच्या पूर्वी निर्देश दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

जिल्हा प्रशासनाने तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना खपलळवशपीं उेाारपवशी म्हणून नियुक्त केले आहे. खपलळवशपीं उेाारपवशी हे त्यांच्या क्षेत्रामध्ये पूर्वी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार राहतील. खपलळवशपीं उेाारपवशी यांच्या मार्गदशनाखाली राज्य शासनाचे सर्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी हे कामकाज करतील. खपलळवशपीं उेाारपवशी हे अत्यावश्यक सेवेसाठीचे पासेस निर्गमित करतील.

तहसीलदार तथा खपलळवशपीं उेाारपवशीी यांनी हॉस्पिटलच्या पायाभूत सुविधांसाठी लागणारे सर्व संसाधने, कामगार, साहित्य इ.चा विनाअडथळा पुरवठा सुरळीत सुरु राहील, याची दक्षता घ्यावी. सर्व सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी चरीज्ञ/ऋरलश र्लेींशी परिधान करणे बंधनकारक असेल अन्यथा ती व्यक्ती शासनाने निश्चित केलेल्या दंडनीय कारवाईस पात्र राहील.

सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी व तेथील वाहतुकीच्या अनुषंगाने एकत्रित येणे टाळून, किमान एक मीटर शारिरीक अंतर (झहूीळलरश्र वळीींरपलश) ठेऊन कामकाज करावे. संबंधित व्यक्तींनी सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे शारिरीक अंतर (झहूीळलरश्र वळीींरपलश) ठेवणे बंधनकारक राहील.

कामाच्या ठिकाणी सर्व येण्या-जाण्याच्या, सामाईक सोयीसुविधांच्या ठिकाणी ढहशीारश्र डलरपपशी, डरपळींळूशी, करपवुरीह, चरीज्ञी / ऋरलश र्उेींशी, करपव ॠर्श्रेींशी ठेवणे आवश्यक आहे. तसेच शक्यतोवर लिफ्टचा वापर टाळून, जिन्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे.

कामाच्या ठिकाणी जेथे माणसांचा स्पर्श होऊ शकतो अशी ठिकाणे उदा. ऊेेी हरपवश्रशी, पाण्याची नळ, कॅन्टीन, बैठक कक्ष, मोकळ्या जागा, व्हरंडा, लिफ्ट्स, मशीन्स, पाण्याच्या टाक्या, वॉशरुम, भिंती इ. निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. वॉश बेसीन व सार्वजानिक शौचालयातील नळ हे पायाने चालविता येतील (ऋेेीं जशिीरींशव ढरिी) असे बसवून घ्यावेत, हात धुण्याची व्यवस्था करावी व कामगारांना कोव्हिड-19 चा प्रादूर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने डणच-छ च् कार्यपध्दतीनुसार हात धुण्यासंदर्भात व स्वच्छतेसंदर्भात प्रशिक्षण द्यावे.

कामाच्या ठिकाणी परिसरात प्रवेश करणारी सर्व वाहने व मशीन्स या स्प्रे च्या सहाय्याने निर्जंतूकीकरण करुन घ्याव्यात. सर्व खाजगी तसेच शासकीय कार्यालयात आरोग्य सेतू अ‍ॅप सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी वापरणे बंधनकारक राहील व याबाबतची जबाबदारी संबंधीत विभागप्रमुखाची राहील.

रायगड जिल्हाधिकारी व पनवेल महानगरपालिका आयुक्त यांनी जाहीर केलेल्या कोविड-19 बाधित प्रतिबंधात्मक क्षेत्रातून (उेपींरळपाशपीं नेपश) मधून अधिकारी/कर्मचारी/कामगारांची वाहतूक करण्यास अथवा जाण्या-येण्यास परवानगी राहणार नाही.

कोव्हिड-19 विषाणूच्या संसर्गामुळे यापूर्वी घोषित केलेले अथवा नव्याने घोषित केल्या जाणार्‍या प्रतिबंधित (उेपींरळपाशपीं नेपशी) क्षेत्रास वरीलप्रमाणे देण्यात आलेल्या बाबींवरील सूट अनुज्ञेय राहणार नाही.

कोणीही व्यक्ती लॉकडाऊनचे निर्बंध व कोव्हिड-19बाबतच्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करतील, त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60 प्रमाणे, भारतीय दंड संहिताचे कलम 188 व इतर कायदेशीर तरतूदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply