Breaking News

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळणार : आ. प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त

पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात तातडीने बैठकीचे आयोजन करण्याची मागणी सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी  जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे  केली आहे.

प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी  निवेदनात म्हंटले आहे की,  पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पामुळे तालुक्यातील सहा ग्रामपंचायती मधील नऊ गांवे, 13 वाडया व सुमारे 3442 कुटुंबे बाधित झाली असून या आदिवासी कुटुंबांना प्रकल्पग्रस्त म्हणून कोणत्याही सोयीसुविधा अद्यापही मिळाल्या नसल्याचेही नमूद केले आहे.

बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळण्याच्या दष्टीने सन 2018 च्या पहिल्या अधिवेशनात दाखल केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मा. मदत व पुनर्वसन मंत्री यांनी सभागहात संबंधित विभागाच्या सर्व अधिकार्‍यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन (विधानसभा आश्वासन क्र.112) दिले होते. त्यानुसार बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांना प्रलंबित मागण्या व प्रश्न मार्गी लागण्याच्या दष्टीने भूसंपादन व पुनर्वसन विषयी इतर धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे असून आपल्या अध्यक्षतेखाली मा. मदत व पुर्नवसन मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच बाळगंगा प्रकल्पाच्या वाढीव प्रकल्प किमंतीच्या अनुषंगाने सिडको, नवी मुंबई यांच्या सहमतीसाठी व्यवस्थापकीय संचालक, सिडको,  प्रधान सचिव जलसंपदा विभाग,  जिल्हाधिकारी रायगड, उपविभागीय अधिकारी, पेण, तहसिलदार, पेण व संबंधित अधिकार्‍यांसमवेत लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी    आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे केली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply