Breaking News

रत्न व आभूषणांचे विद्यापीठ उभारा : मुख्यमंत्री

नवी मुंबई : बातमीदा

रत्न व आभूषणांचे पार्क महापे येथे होणार असून जगात सर्वश्रेष्ठ असे हे पार्क असणार आहे, मात्र व्यापार्‍यांनी यावर समाधान न मानता रत्न व आभूषणे विद्यापीठ उभारावे. त्यासाठी महाराष्ट्रात कोठेही जागा देण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 5) दिले. ते महापे नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या नियोजित अशा देशातील सर्वात मोठ्या ज्वेलरी पार्कच्या शीलान्यास प्रसंगी बोलत होते.

एमआयडीसी अधिकार्‍यांचे कौतुक करताना अगदी वेगात त्यांनी सर्व प्रकिया पूर्ण करत महापे येथील जागा व्यापारी वर्गाला दिली. त्यामुळेच हे स्वप्न पूर्ण झाल्याचे फडणवीस म्हणाले. या वेळी त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू व औद्योगिक मंत्री सुभाष देसाई यांचे कौतुक करतानाच त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

मुंबईत सध्या कोठेही नव्याने उभारता येईल अशी जागा राहिलेली नाही. त्यामुळे प्रचंड वेगाने वाढणार्‍या नवी मुंबई शहरातील महापे या औद्योगिक पट्ट्याची निवड करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले.  या वेळी केंद्रीय वाणिज्यिक मंत्री सुरेश प्रभू, औद्योगिक मंत्री सुभाष देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply