Breaking News

नव्या कोळी प्रजातीला सचिन तेंडुलकरचे नाव

अहमदाबाद : वृत्तसंस्था

गुजरात पर्यावरणशास्त्र आणि संशोधन संस्थेतील कनिष्ठ संशोधकाने नुकताच दोन कोळी प्रजातींचा शोध लावला. इंडोमॅरेंगो आणि मॅरेंगो अशी या दोन प्रजातींची नावे आहेत. यातील एका प्रजातीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आले आहे.

ध्रुव प्रजापती असे या संशोधकाचे नाव असून, ते कोळी वर्गीकरण या विषयावर पीएचडी करीत आहेत. ध्रुव यांच्या संशोधनातील निष्कर्ष नुकतेच रशियन जर्नल ‘अर्थ्रोपोडा सिलेक्टा’मध्ये प्रकाशित झाले.

सचिनचे नाव कशामुळे?

ज्यांच्यामुळे आपण प्रेरित होतो, त्यांची नावे या प्रजातींना दिली असल्याचे ध्रुव यांनी सांगितले. ‘मॅरेंगो सचिन तेंडुलकर हे नाव दिले, कारण सचिन हा आवडता क्रिकेटपटू आहे, तर दुसरे नाव हे संत कुरैकोस एलिया छावरा यांच्यापासून प्रेरणा घेऊन दिले. केरळातील शिक्षणात जागरूकता निर्माण करणारे ते एक धर्मयोद्धे होते,’ अशी माहिती ध्रुव यांनी दिली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply