Breaking News

रोह्यात पोलिसांकडून हजारो वाहनचालकांवर कारवाई

रोहे : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊनमध्ये रोह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून विनाकरण फिरणार्‍या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहेत. विनाकारण बाहेर फिरणार्‍या नागरिकांनाही घरी जाण्याच्या व घरातच राहण्याच्या सूचना पोलीस विभागाकडून देण्यात येत आहेत.लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य गाड्या रस्त्यावर उतरवण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीसुध्दा रोहा शहरात अनेक दुचाकी व चारचाकी अवैधरीत्या रस्त्यावर उतरविल्यामुळे रोहा वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. 27  मार्च ते 20 एप्रिलदरम्यान 1009 केसेस करण्यात आल्या असून त्या माध्यमातून  2,80,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शितोळे, उपनिरीक्षक शेगडे, अडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने वाहतूक पोलीस हणमंत धायगुडे, जनार्दन चेरकर, मपोना. प्रशिला चव्हाण, पो. कॉ. शिर्के यांनी रोहा शहरात लॉकडाऊनच्या काळातही  भर उन्हात राम मारुती चौक, दमखाडी नाका, रोहा अष्टमी पूल येथे वेळोवेळी नाकाबंदी करून अवैध वाहनांवर कारवाई केली. परवाना नसणे, गाडीची कागदपत्रे व लॉकडाऊन काळात फिरणार्‍या अनेक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. रोह्यात 25 दिवसांत दुचाकी व चारचाकी अशा एकूण 1009 केसेस दाखल केल्या असून त्या माध्यमातून  2,80,500  रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply