कर्जत : बातमीदार
तालुक्यातील सहा प्राथमिक शाळांमध्ये शिकणार्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षकसेनेच्या वतीने शैक्षणिक साहित्याची मदत करण्यात आली. शिक्षक सेना या संघटनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर आणि कोकण विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत तालुक्यातील शेलू, बेडीसगाव, आधारवाडी, चिकनपाडा, माले आणि पाषाणे येथील प्राथमिक शाळांंमधील गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, वही, पेन आणि चटई या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी संघटनेचे कर्जत तालुका हनुमंत भगत, उपाध्यक्ष संतोष कांबरी, सचिव जयवंत पारधी, सल्लागार रमेश कुंभार, मसणे यांच्यासह ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.