Breaking News

शिवकर येथे आंतरजातीय विवाहसोहळा संपन्न

पनवेल ः बातमीदार

शिवकर ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने सुरज ढवळे आणि सुश्मिता जाधव यांचा आंतरजातीय विवाहसोहळा रविवारी (दि. 16) ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडला. या आंतरजातीय विवाह सोहळ्यामध्ये शिवकर गावातील तसेच ढवळे परिवारातील मोजकेच सदस्य उपस्थित होते. हा सोहळा वैदिक पद्धतीने दोन्ही कुटुंबांच्या आईवडिलांच्या परवानगीने संपन्न झाला. उच्चशिक्षित मुलगी आणि व्यावसायिक मुलगा हे दोन नवदाम्पत्य विवाहाच्या माध्यमातून एकत्रित येऊन सुखी संसार करणार असून यामध्ये ग्रामपंचायतीने सामाजिक भूमिका बजावत विवाहास सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply