पनवेल : पनवेल तालुक्यात महाशिवरात्र विविध कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त नेरे येथील श्री हनुमान व्यायाम मंडळाच्या वतीने ‘प्राचीन केसरी महासंग्राम’ या कुस्ती सामन्यांचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या सामन्यांना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, आयोजक राजेश डाके, हेमंत डाके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …