Breaking News

रसायनीत पक्षीसप्ताहानिमित्त तरुणांना मार्गदर्शन

मोहोपाडा : वार्ताहर

रसायनी व आसपासच्या परिसरांतील तरुणांना निसर्गाविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून पक्षी निरीक्षण सप्ताहानिमित्ताने मारोती चितमपल्ली (पक्षीतज्ज्ञ) व डॉ. सलिम अली (पक्षीतज्ज्ञ) यांच्या प्रेरणेने मोहोपाडा एचओसी कॉलनी परिसरातील तरुणांना विविध पक्षांविषयी माहिती देण्यात आली. या वेळी पक्षी कसे ओळखायचे, त्यांचा शोध कसा घ्यायचा याविषयी पक्षीतज्ज्ञांनी माहिती दिली.

या वेळी राष्ट्रभक्तीविषयक तरुणांना प्रवीण पाटील (निवृत्त भारतीय सैनिक) यांनी मार्गदर्शन केले. वाशिवली रसायनी येथील निवृत्त सैनिक प्रवीण पाटील यांनी दिलेल्या माहितीने तरुण वर्गात देशाभिमान जागृत झाल्याचे या वेळी दिसून आले. असाच उपक्रम बहार नेचर फाउंडेशन वर्धाचे दिलीप विरखडे हे गेल्या दोन वर्षापासून विदर्भात राबवत आहेत व त्यांच्या प्रेरणेनेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे मोहोपाडा येथील पक्षी अभ्यासक विनायक डुकरे यांनी सांगितले. पक्षी अभ्यासक विनायक डुकरे यांनी पक्षांच्या विविध जातींवर अभ्यास करून पक्षी वाचविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply