हिंदू महासभेची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कारसेवकांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याची मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. कारसेवकांवरील खटले मागे घेण्याव्यतिरिक्त त्यांनी कारसेवकांना शहीदांचा दर्जा देण्यात यावा, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्याची मागणीही केली आहे. यादरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी तयार करण्यात येणार्या ट्रस्टच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विराजमान व्हावे, असं राम जन्मभूमी न्यासाकडून सांगण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी गोरक्षा पीठाचे महंत म्हणून ट्रस्टच्या अध्यक्षपदी विराजमान व्हावे, असे म्हटले आहे. गोरखपूरमध्ये असलेले प्रतिष्ठित गोरखनाथ मंदिर हे गोरक्षा पीठाचे आहे, तसेच राम मंदिर आंदोलनात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. महंत दिग्विजयनाथ, महंत अवैद्यनाथ आणि योगी आदित्यनाथ यांनी मंदिर आंदोलनात मोठी भूमिका बजावली होती, असे न्यासाचे अध्यक्ष मंहत नृत्य गोपाल दास यांनी सांगितले. वृत्तसंस्था आयएएनएसने या संदर्भात वृत्त दिले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper