Breaking News

लग्न मोडण्यासाठी नवरी मुलीनेचे पाठविले प्रियकराकरवी फोटो

चेन्नई : वृत्तसंस्था

लग्न थांबवण्यासाठी नवरी मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आपले फोटो नवर्‍या मुलाच्या मोबाइलवर पाठवल्याची घटना समोर आली आहे. चेन्नईमध्ये ही घटना घडली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले असून, पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला समज दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. नवरी मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत फोटो पाठवणार्‍या व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती, तसेच लग्न मोडल्याबद्दल नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबियांविरोधातही कारवाई करावी, असे त्यांनी म्हटले होते. यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला होता. पोलिसांनी ज्या क्रमांकावरून फोटो आणि व्हिडीओ आले होते तो मोबाइल नंबर मिळवला. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याच्या मोबाइलची पाहणी केली. या वेळी काही मित्रांनी पाठवलेले मेसेज डिलीट करण्यात आले असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान तरुणाने नवरी मुलीनेच आपल्याला इच्छेविरोधात लग्न होत असल्या कारणाने हे फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यास सांगितले असल्याची कबुली दिली. तरुणाने आपण मुलीच्या प्रेमात पडलो होतो, पण कुटुंबीयांनी विरोध केल्याने इच्छेविरोधात ती लग्नासाठी तयार झाली होती, असे पोलिसांना सांगितले. यानंतर तरुणीने लग्न मोडण्यासाठी नवर्‍या मुलाचा नंबर पाठवला आणि त्याच्यावर आपले काही फोटो आणि व्हिडीओ पाठव असे तरुणाला सांगितले होते. पोलिसांनी यानंतर सर्वांना बोलावून सामंजस्याने प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर मुलीच्या वडिलांनी तक्रार मागे घेतली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply