सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत यांच्या पाठपुराव्याला यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष अणि विकास हे एक समीकरण बनले आहे. त्यानुसार पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासाची कामे सुरू आहेत. त्या अंतर्गत पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक अनिल भगत यांच्या पाढपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 19मधील गुरुशरणम इमारतीच्या समोरील रस्त्याचे व पावसाळी गटाराचे उन्नती करणाचे काम मंजुर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 23) करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील गुरुशरणम सोसायटी ते रायगड टिंबर मार्डपर्यंत्तच्या रस्त्याचे पावसाळी गटारांच्या उन्नतीकरणाच्या कामासाठी 66 लाख 27 हजार 16 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामासाठी सभागृह नेते परेश ठाकूर आणि नगरसेवक अनिल भगत यांनी पाठपुरावा केला होता. या कामाच्या भूमिपूजनावेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, संजय भगत, जितेंद्र महाजन, विशाल ठाकूर, हस्तीमल जैन, प्रवीण मोहोकर, विनायक मुंबईकर, रजनिश जाधव यांच्यासह पदाधिकारी, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.