पनवेल : वार्ताहर
पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी आज शहरातील पाडा मोहल्ला, कफनगर, परदेशी आळी, चिंतामणी हॉल परिसर अशा अनेक ठिकाणी जाऊन त्या भागातील विविध समस्या जाणून घेतल्या, तसेच तातडीने संबंधित महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांना या तक्रारी सांंगून काही तक्रारींचे जागीच निवारण केले. शहरातील अनेक ठिकाणी विविध समस्या नागरिकांना आहेत. त्यामध्ये नाले सफाई, गटार तुंबणे, रस्ते, पेव्हर ब्लॉक, खड्डे, औषध फवारणी, वाहतूक कोंडीसह इतर प्रश्नांची माहिती स्थानिक नागरिकांकडून उपमहापौर विक्रांत पाटील यांनी घेतली. अनेक समस्या या कित्येक वर्षापासून प्रलंबित होत्या. त्यांचे निवारण करण्यासाठी त्याचप्रमाणे कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने या समस्यांकडे त्यांनी महत्त्वपूर्ण लक्ष घातले. या संदर्भात संबंधित महानगरपालिका, तसेच इतर शासकीय अधिकार्यांशी संपर्क साधून त्यांना या समस्येची माहिती करून दिली व काही समस्यांचे निवारण जागीच केले. या संदर्भात रहिवाशांना काही समस्या अथवा कोणत्याही सकारात्मक सूचना द्यायच्या असल्यास त्यांनी उपमहापौर विक्रांत पाटील 9819675666 या व्हॉटस्अॅप क्रमांकावर संपर्क साधावा.