Breaking News

पोशिर हायस्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन

नेरळ ः बातमीदार

 कर्जत तालुक्यातील पोशिर येथे असलेल्या श्रमजीवी जनता विद्यामंदिर या माध्यमिक शाळेत बालदिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची गोडी लागावी आणि ती वाढीस जावी यासाठी विज्ञान प्रदर्शन सर्व शाळांत आयोजित करावे, असे आवाहन कर्जत पंचायत समितीचे केंद्रप्रमुख कृष्णा पवार यांनी केले.

   श्रमजीवी जनता विद्यामंदिर शाळेत शिकणार्‍या माध्यमिक विद्यालयात बालदिन अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला होता. माध्यमिक शाळेतील 30 प्रतिकृती या विज्ञान प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. प्रदर्शनाचे उद्घाटन कर्जत पंचायत समितीचे वारे केंद्रप्रमुख पवार आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. के. माने यांचे हस्ते करण्यात आले.  एस. एन. म्हात्रे, टोकले, एन. इ. राणे, पोळ या विज्ञान शिक्षकांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी 30हून अधिक प्रतिकृती मांडल्या होत्या. त्यात कृषी व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्था सुधारणा, स्वच्छता व्यवस्थापन, हवेच्या दाबावर चालणारी क्रेन, रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा तुलनात्मक वापर, प्रदूषण नियंत्रण, शेणापासून वीजनिर्मिती अशा अनेक प्रतिकृती विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडल्या होत्या.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply