Breaking News

‘लॉकडाऊन’ असेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी आणावी

कर्जत भाजप महिला मोर्चाची मागणी

कर्जत ः बातमीदार
कर्जत तालुक्यात मागील तीन दिवसांपासून मद्यविक्रीस शासनाने परवानगी दिली आहे. परिणामी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले असून लॉकडाऊन लागू असेपर्यंत मद्यविक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. तशा आशयाचे निवेदन भाजप महिला मोर्चाच्या वतीने कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले आहे.
भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष कल्पना दास्ताने, कर्जत तालुका अध्यक्षा स्नेहा गोगटे, तालुका उपाध्यक्ष गायत्री परांजपे, कर्जत नगरपालिकेच्या नगरसेविका स्वामिनी मांजरे, स्वप्ना सोहनी आदींनी तहसील कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. भाजप महिला मोर्चाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मद्यविक्री करण्याचे आदेश काढल्याने सकाळ होताच मद्यप्रेमी गर्दी करू लागतात. या वेळी त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. वाइन शॉप उघडण्याची वेळ शासनाच्या जुन्या नियमावलीप्रमाणे 11 वाजताची आहे, मात्र सकाळी नऊ वाजता वाइन शॉप आणि बीअर शॉपी उघडल्या जातात. त्यामुळे शासनाचे नियम डावलून मद्याची दुकाने उघडली जाताहेत. महसुलासाठी लॉकडाऊन काळात शासन मद्यविक्रीस परवानगी देणार असेल, तर दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगबाबत दक्षता घेणेही गरजेचे आहे. मद्यप्रेमी अशाच प्रकारे नियम डावलून मद्याच्या दुकानांबाहेर गर्दी करणार असतील तर त्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांना अहवाल पाठवण्याची मागणीही भाजप महिला मोर्चाने केली. कल्पना दास्ताने यांनी मद्याची दुकाने बंद ठेवून कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी या वेळी केली.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply