Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले म्हात्रे कुटुंबीयांचे सांत्वन

पनवेल : वार्ताहर

पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या मातोश्री सखुबाई मोरू म्हात्रे यांचे शनिवारी

(दि. 16) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्या 85 वर्षांच्या होत्या. गव्हाण-कोपर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोपर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या त्या आजी होत्या. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महानगरपालिकेतील सभागृह नेते परेश ठाकूर यांनी म्हात्रे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

सखुबाई यांच्या निधनाचे वृत्त समजताच उरण, पनवेल, खालापूर तालुक्यातील हजारो लोकांनी म्हात्रे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी धाव घेतली. सखुबाई यांच्या पश्चात जनार्दन म्हात्रे, विजय म्हात्रे, अनंता म्हात्रे असे पुत्र, सीमाताई म्हस्कर या विवाहित कन्या, अमाप्त, चेतन, सचिन, प्रीतम, विपुल अशी नातवंडे, जावई, सुना, नातसुना असा मोठा परिवार आहे.

सखुबाई म्हात्रे यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पमपाचे भाजप गटनेते परेश ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, महाराष्ट्र कोळी महासंघाचे अध्यक्ष तसेच विद्यमान विधान परिषद सदस्य रमेश पाटील, काशिनाथ पाटील, मेघनाथ तांडेल, कामगार नेते महेंद्र घरत, राजेश केणी, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, गणेश कडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील, पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ-2चे उपायुक्त अशोक दुधे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply