Breaking News

…अन् धोनीने राखला तिरंग्याचा मान

हॅमिल्टन : वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्‍या आणि निर्णायक ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने एका कृतीने मैदानातील उपस्थित प्रेक्षक आणि टीव्हीवर सामना पाहणार्‍या भारतीयांची मने जिंकली. सामना सुरू असताना धोनीचा एक चाहता त्याच्याकडे धावत आला. त्याच्या हातात राष्ट्रध्वज होता. तो चाहता धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला. चाहत्याच्या हातातील तिरंगा जमिनीवर पडणार होता. तितक्यात धोनीने प्रसंगावधान राखत तिरंगा आपल्या हातात घेतला. देश आणि राष्ट्रध्वजाबद्दलचे त्याचे हे प्रेम पाहून सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. 

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे फलंदाज मैदानावर होते. पहिल्या डावातील 14वे षटक होते. त्या वेळी अचानक एक भारतीय प्रेक्षक मैदानावर आला. तो धोनीच्या दिशेने धावला. त्याच्या हातात राष्ट्रध्वज होता. तो चाहता धोनीच्या पाया पडण्यासाठी खाली वाकला. त्याचवेळी त्याच्या हातातील तिरंगा जमिनीवर पडणार होता हे धोनीने पाहिले. त्याने लगेच चाहत्याच्या हातातील तिरंगा घेतला. धोनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. धोनीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

शांत स्वभाव, यष्ट्यांमागे तितकाच चपळ आणि प्रसंगी हातातून निसटलेला सामना जिंकून देण्याची त्याची क्षमता, उत्कृष्ट कर्णधार या सर्व गुणांमुळे धोनीने आधीच सर्वांच्या मनात घर केले आहे. आता मैदानावरील या कृतीमुळे त्याच्याविषयीचा चाहत्यांच्या मनात असलेला आदर आणखी वाढल्यास नवल वाटायला नको.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply