नवी दिल्ली : वृत्तसंस्था
टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसर्या ट्वेन्टी-20 सामन्यात चार धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने मालिका 2-1ने जिंकली. या सामन्यात शेवटच्या षटकात दिनेश कार्तिकने चुकीचा निर्णय घेतला नसता; तर कदाचित भारताचा पराभव टळला असता, असे मत फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केले आहे.
शेवटच्या चेंडूवर षटकार लगावणे म्हणजेच फिनिशिंग बॅट्समन होणे नाही. बरोबर असलेल्या फलंदाजावर विश्वास ठेवणे आणि देशाला जिंकू देणे हे खर्या फिनिशरचे कसब आहे, असे हरभजन म्हणाला.