Breaking News

मलनिस्सारण वाहिन्या बदलून नाले दुरुस्तीची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त

 कामोठे शहरातील बर्‍याच ठिकाणी मलनिस्सारण वाहिन्या तुंबल्या आहेत. त्यामुळे येथील मलनिस्सारण वाहिनी बदलून नाले दुरुस्त करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी सिडकोकडे करीत तसे निवेदन मुख्य कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे.

कामोठे शहर सिडकोने वसवलेले शहर आहे. मोठ्या प्रमाणात इमारती येथे बांधण्यात आल्या आहेत, मात्र येथे सुविधांचा बोजवारा उडाला आहे. वाहिन्यांमधून घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी सिडकोचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. या मलनिस्सारण वाहिन्यांची क्षमता कमी असल्याने नेहमीच त्या तुडूंब भरलेल्या असतात. कामोठे शहरातील नाल्यांचा सर्व्हे करून नवीन झाकणे बसवणे व काही ठिकाणी

दुरुस्ती करून साफसफाई करण्याची आवश्यकता आहे.  यासंदर्भात नगरसेवक भगत यांनी मल्हार टीव्हीला अधिक माहिती दिली.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply