Breaking News

रस्त्यांचे रिसर्फेसिंगचे काम सुरू

खारघरमध्ये भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यश

खारघर : प्रतिनिधी

येथील सेक्टर 12 ते 21मधील रस्त्यांचे रिसर्फेसिंगचे काम मंगळवारी (दि. 19) सेक्टर 19मध्ये सुरू झाले. यासाठी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. ते श्रेय या सर्वांचेच आहे. टेंडर होईपर्यंत गेल्या तीन वर्षांत सेक्टर 19मधील इतर अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यांचाही यामध्ये समावेश होणे आवश्यक आहे. त्यासाठी जोमाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. 2016च्या जानेवारीपासून सतत अविरत पाठपुरावा करीत खारघरच्या सेक्टर 12 ते 21मधील रस्त्यांचे रिसर्फेसिंगचे तसेच रेनवॉटर, गट दुरुस्ती, कर्ब स्टोन दुरुस्ती व सिमेंटची झाकणे यांची सिडकोमार्फत निविदा मागील डिसेंबर 2018ला होऊन त्या कामांची वर्क ऑर्डर मार्च 2019ला मे. अजवानी इफ्रा. या कंपनीला देण्यात आली. या कामाचा शुभारंभ  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. सदर काम प्रगतिपथावर आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्वसमावेशक काम चालू आहे. आज से. 19मध्ये निविदेतील कामास सुरुवात झाली आहे. यासाठी असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. ते श्रेय या सर्वांचेच आहे. टेंडर होईपर्यंत गेल्या तीन वर्षांत सेक्टर 19मधील व इतर सेक्टरमधील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्याही रस्त्यांचा सदर कामाबरोबर समावेश होणे आवश्यक आहे. त्यासाठी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना भाजप खारघरतर्फे निवेदन देण्यात येणार आहे. या वेळी प्रभाग 4चे माजी सभापती व नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेविका नेत्रा पाटील, भाजप शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप जाधव आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply