ठाणे : प्रतिनिधी
येथील श्री मावळी मंडळातर्फे आयोजित 31व्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत अक्षय कारभारी मावळी मंडळ श्री किताबाचा मानकरी ठरला. कळव्याच्या अपोलो जिमने 44 गुण मिळवून सांघिक विजेतेपद मिळवले, तर भिवंडीच्या युनिव्हर्सल फिजिक्स सेंटरला 20 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
शायन कासकरने सर्वोत्कृष्ट प्रदर्शकाचा पुरस्कार मिळवला. वैभव शिंदे आणि विवेक सिंग यांना अनुक्रमे दुसर्या व तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.