Breaking News

एक्स्प्रेस वेवर तीन कार एकमेकांना धडकल्या

मोठे नुकसान; सुदैवाने जीवितहानी नाही

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खालापूर टोल नाक्याच्या पुढे पुणे लेनवर तीन कार एकमेकांना धडकून विचित्र अपघात घडला. यात तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाही. पुढील कारला ओव्हरटेक करताना कार अनियंत्रित झाली व दुसर्‍या लेनवर गेली. दरम्यान, त्या लेनवर भरधाव वेगात असलेल्या अन्य दोन कार त्या कारला धडकल्या. अशा प्रकारे तीन कार एकमेकांना धडकून विचित्र अपघात घडला. या अपघातात तिन्हीही कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. यादरम्यान काही वेळ गोंधळाची स्थिती व वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. महामार्गावरील पोलीस यंत्रणा व गस्ती पथकाने तत्काळ मदत करून अपघातग्रस्त कार बाजूला करून वाहतूक सामान्य केली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply