Breaking News

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत मोलाचे योगदान देणारे थोर व्यक्तिमत्त्व, एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजप खारघर-तळोजा मंडल, एसबीआय आणि शुभम सामाजिक सेवाभावी संस्था (खारघर ओवेपेठ) यांच्या संयुक्त विद्यमाने धामोळे गाव येथे शनिवारी (दि. 26) 2500 वृक्षांची लागवड करण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी मान्यवरांच्या हस्ते धामोळेवाडीतील मुलांना मास्क व शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना आज वृक्ष लागवड का महत्त्वाची आहे तसेच मागील आठवड्यात उत्तर रायगड जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांच्या योगदानाने यशस्वीपणे साजरा झालेल्या सेवा सप्ताहाची माहिती दिली. एसबीआय बँकेचे निवृत्त जनरल मॅनेजर आर. के. अगरवाल यांनी खारघरमधील धामोळेवाडीतील या जागेवर वृक्षारोपण करून काँक्रीटच्या जंगलाच्या बाजूलाच नैसर्गिक जंगलाचे संवर्धन होत असल्याबद्दल उपक्रमाचे कौतुक केले. या झाडांची केवळ लागवड न करता पुढील वर्षभर या झाडांना खतपाणी देऊन त्यांची निगा राखण्याची जबाबदारीसुद्धा घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.  या कार्यक्रमाला भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महानगरपालिका स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, अ-प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अ‍ॅड. नरेश ठाकूर,  हरीश केणी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, सरचिटणीस कीर्ती नवघरे, वैद्यकीय सेल संयोजक किरण पाटील, उपाध्यक्ष रमेश खडकर, उपाध्यक्ष निशा सिंग, महिला मोर्चा सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्ष प्रतीक्षा कदम, चिटणीस योगिता कडू, मंडल चिटणीस गुरू ठाकूर, प्रभाग 4 अध्यक्ष वासुदेव पाटील, कामगार आघाडी संयोजक गुरुनाथ म्हात्रे, संतोष शर्मा, आर. के. दिवाकर, विपुल चौटालिया, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, हॅपी सिंग तसेच प्रभाग 3, 4, 5, 6 मधील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विभागीय व्यवस्थापक रजनीश कुमार, बँकेचे हर्षद नेगी व मनस्वी पटेल यांच्यासह अनेक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योग आघाडीचे संयोजक राजेंद्र मांजरेकर, भाजप सोशल मीडिया सेल प्रदेश सदस्य चांदणी अवघडे, उत्तर रायगड जिल्हा सहसंयोजिका मोना अडवाणी, खारघर-तळोजा सोशल मीडिया सेल संयोजक अजय माळी तसेच शुभम सामाजिक सेवाभावी संस्था यांनी परिश्रम घेतले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply