Breaking News

विंडीज दौर्यात ‘हिटमॅन’ला विश्रांती?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. 22 नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. त्याआधी 21 नोव्हेंबरला एमएसके. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवड समिती आगामी विंडीज दौर्‍यासाठी भारतीय संघाची निवड करणार आहे. या बैठकीत वन-डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मावर अतिक्रिकेटमुळे येणार्‍या ताणाबद्दल चर्चा होऊ शकते.

विंडीजच्या भारत दौर्‍यात दोन्ही संघ प्रत्येकी तीन टी-20 आणि वन-डे सामने खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर जाणार आहे. त्यामुळे या मालिकेआधी रोहितला पुरेसा आराम मिळावा यासाठी विंडीजविरुद्धच्या मालिकेत त्याला विश्रांती मिळू शकते. न्यूझीलंड दौर्‍यात भारतीय संघ पाच टी-20, तीन वन-डे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

याव्यतिरिक्त भारतीय संघाचा दुसरा सलामीवीर शिखर धवन सध्या खराब फॉर्मात आहे. स्थानिक क्रिकेटमध्येही धवनला त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्यामुळे या मालिकेसाठी लोकेश राहुलला पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे निवड समिती कोणत्या खेळाडूला संघात स्थान देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply