Breaking News

दोन ट्रेलर चोरांना अटक; तर तिघांचा शोध सुरू

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जीडीएल गोदामाजवळून उभ्या असलेल्या जागेतून 6 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते 7 नोव्हेंबर 2019 सकाळी 7 वाजताच्या दरम्यान 40 फुटी ट्रेलर चोरणार्‍या टोळीतील दोन आरोपींना उरण पोलिसांनी अटक केली. या टोळीतील आणखी तीन आरोपी फरारी असून, उरण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या वृत्तानुसार उरण तालुक्यातील नवघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील, सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील जीडीएल गोदामाजवळून 6 नोव्हेंबर 2019 रात्री 10 ते 7 नोव्हेंबर 2019 सकाळी 7 वाजताच्या दरम्यान अज्ञात इसमांनी ट्रेलर चोरून नेला असल्याची तक्रार कुलभूषण विद्याभूषण प्रभू (34, रा. रोडपाली, कळंबोली) यांनी उरण पोलीस ठाण्यात केली होती. त्यांच्या तक्रारीवरून या ट्रेलर चोरांचा शोध घेत अवघ्या काही दिवसांत यातील आरोपी समशेर गुरुदेव सिंग (24, धंदा चालक, रा. कळंबोली, मूळ राहणार रैया, पो. खालचिया, ता. बाबाबुकाला, जि. अमृतसर, पंजाब) व गगनप्रित हरजेन्द्र सिंग (28, धंदा चालक, रा. व्हिक्टोरिया पार्क, रोडपाली, नवी मुंबई) यांना शिताफीने अटक केली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यांची रवानगी तळोजा येथील कारागृहात करण्यात आली आहे.

या आरोपींनी कळंबोली येथे चोरून नेलेला 13 लाख रुपये किमतीचा पांढर्‍या रंगाचा ट्रेलर व त्यावर पांढर्‍या व लालसर रंगाची 40 फुटी ट्रॉली आणि एमएच 04 एफपी 4523 क्रमांकाचा धनश्री कार्गो मुव्हर्स असे लिहिलेला ट्रेलर उरण पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला आहे.

त्यांच्या टोळीतील बाबू सरदार, अजय सस्ते, इम्तियाज खान (तिघेही राहणार कळंबोली) हे आणखी तीन साथीदार फरारी अहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी उरण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी काठे यांचे पोलीस पथक अधिक तपास करीत असून, या टोळीतील तीन फरारी आरोपींना लवकरच जेरबंद करणार असल्याची माहिती शिवाजी काठे यांनी दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply