Breaking News

नवी मुंबई डाक विभागात डाकसेवकांची पदभरती

नवी मुंबई : प्रतिनिधी

भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या 19 पदांसाठी तसेच इतर भरती कार्यालयांमार्फत 41 डाक सेवक/सहाय्यक शाखा डाकपाल ही पदे भरली जाणार आहेत, असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, पनवेल यांनी कळविले आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी 30 नोव्हेंबरपर्यंत http://appost.in/gdsonline/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. नवी मुंबई विभाग कार्यक्षेत्रातील पात्र उमेदवारांना अर्जाची फी प्रधान डाकघर, पनवेल यांच्याकडे जमा करता येणार आहे. भारतीय डाक विभाग पैसे भरण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फोन व संदेश पाठवत नाही. निवड झालेल्या उमेदवारांना सिस्टीम जनरेटेड संदेश त्यांची निवड झाल्यावर प्राप्त होऊ शकेल. आवश्यक पत्रव्यवहार अधिकृत भरती कार्यालयामार्फत केला जाईल याची नोंद घ्यावी. त्यामुळे उमेदवारांनी आपला नोंदणीकृत क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर करू नये व अशा फसव्या अफवांपासून सावध राहावे, तसेच भारतीय डाक विभाग कोणत्याही हेतूसाठी आपणास फोन करीत नाही. म्हणून उमेदवारांनी याबाबत जागरूक राहावे आणि कोणत्याही अफवांना किंवा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन प्रसिद्धिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. http://appost.in/gdsonline/

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply